आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाकाळात राज्य सरकारने एकही रुग्णालय सुरू केले नाही, मात्र नाशिक महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपने काेविड रुग्णांसाठी विशेष रुग्णालय सुरू करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले. आम्ही पण निधड्या छातीने या महामारीच्या कालावधीमध्ये लोकांमध्ये फिरून शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न केल्यामुळे लोकांनी लक्षात ठेवले. यांच्यासारखा घरात बसून राहिलो नव्हतो, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव न घेता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.
नाईन न्यूज या चॅनलच्या वतीने ‘गोदा सन्मान २०२२’ पुरस्काराचे वितरण गंगाघाटावर झाले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, पुणे येथील मुळा-मुठा नदीच्या स्वच्छतेच्या अकराशे कोटींच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नागपुरातील नाग नदी स्वच्छतेसाठी १९०० कोटी रुपयांचा आराखडा मंजुर करण्यात आला आहे. नमामी गोदा प्रकल्पासाठीदेखील केंद्र सरकारकडून १८०० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर होणार आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन व भाजपचे प्रभारी जयकुमार रावल यांनी शिवसेनेवर टीका केली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला. संचालक किशोर बेलसरे यांनी प्रास्ताविक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.