आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:कोरोनाने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, गावात दहशतीचे वातावरण

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • एकाच कुटुंबातील ५ जण १० दिवसांतच गेल्याने नांदुरशिंगोटे हादरले.

नांदुरशिंगोटे येथे कोरोनाच्या तांडवात एकाच कुटुंबातील पाच जणांचा १० दिवसातच बळी गेला. शेळके कुटुंबीयांच्या घरातील कर्ती माणसे एकामागोमाग काळाच्या पडद्याआड गेली. या घटनेने परिसरासह तालुका हादरून गेला. पाठोपाठ याच गावातल्या आव्हाड कुटुंबातील तीन जण दगावल्याने दहशतीचे वातावरण आहे.

बाबूराव शिवराम शेळके हे दापूर येथे बहिणीकडे जाऊन आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर नाशकात उपचार सुरू होत नाही तोच, घरातील आणखी चार जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली. दोघांना नाशिक येथे तर एकास संगमनेरला दाखल करण्यात आले. बाबूराव (७५) यांच्या निधनानंतर २ दिवसांनी पत्नी लक्ष्मीबाई (७०) यांनी अखेरचा श्वास घेतला. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच त्यांची मुले सुरेश (५८) व रमेश (५२) यांनी तीन दिवसाच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. रमेश शेळकेंचा मुलगा सचिन (३०) यास काळाने हिरावले. एकाच कुटुंबातील ५ जण १० दिवसांतच गेल्याने नांदुरशिंगोटे हादरले. बाबूरावांची दापूर येथील बहिण सुनंदा आव्हाड यांचा कोरोनाने मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...