आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:शहरी भागांत कोरोनाच्या लाटेस ओहोटी, पण ग्रामीण महाराष्ट्रात दिवसेंदिवस मोठी भरती

नाशिक2 महिन्यांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक
  • अहमदनगरमध्ये दररोज 500 ते 700 रुग्ण

लोकसंख्येची अधिक घनता असलेल्या राज्यातील शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी ग्रामीण महाराष्ट्रात मात्र ती वेगाने वाढताना दिसत आहे. सातारा, सांगली, सोलापूर व नगर या जिल्ह्यांतील मंगळवारच्या (२७ जुलै) एका दिवसातील रुग्णसंख्येने पुणे, मुंबई, ठाणे या शहरांनाही मागे टाकले आहे. महापालिका क्षेत्रांमध्ये नियमांचे पालन आणि ग्रामीण भागात अनिर्बंध पद्धतीने कौटुंबिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये होत असलेली गर्दी हेच याचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बीडमध्येही नियमांकडे दुर्लक्ष
४ दिवसांत बीडमध्येही रुग्णसंख्या वाढते आहे. बाजारपेठ, समारंभांत मास्क न वापरणे, नियम न पाळल्याने संसर्ग वाढत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. ग्रामीण भागात वाढते लग्न समारंभ व जाहीर कार्यक्रम संसर्गाला कारणीभूत ठरत आहेत.

हे दुसऱ्या लाटेचेच शेपूट
परदेशातून हा विषाणू प्रथम शहरात आला. शहरातील लोकसंख्येच्या घनतेमुळे शहरांत पसरला. त्यानंतर ग्रामीण भागात धीम्या गतीने घुसला. आता शहरांमधील वाढते लसीकरण व नियमांचे पालन यामुळे शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे दिसते आहे. - डॉ प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी

अहमदनगरमध्ये दररोज ५०० ते ७०० रुग्ण
जूनअखेरीस अवघे २३५ रुग्ण असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात सध्या सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५,४२२ पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १४.०२ एवढा वाढला आहे. जिल्ह्यात बाजारपेठांमधील वाढती गर्दी यास कारणीभूत ठरली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुन्हा निर्बंध आणले, मात्र त्यांची पायमल्ली अर्धे शटर उघडून चोरट्या मार्गाने व्यवहार सुरूच ठेवल्याने नियमांची पायमल्ली झाली.

बातम्या आणखी आहेत...