आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Corona Nashik | Marathi News | Nashik | Update | 416 Metric Tons Of Oxygen Planning; Administration Alert 100 Ton Buffer Stock, Facing Potential Waves

पालिका अॅक्शन मोडवर:तब्बल 416 मेट्रिक टन ऑक्सिजनचे नियोजन; प्रशासन अलर्ट 100 टन बफर स्टॉक, संभाव्य लाटेचा सामना

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ तसेच ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्यानंतर महापालिका आता ॲक्शन मोडवर आली असून योगायोगाने डॉ. झाकीर हुसैन आणि बिटको रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला ‘पेसो’ परवाना प्राप्त झाल्यामुळे अतिरिक्त ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहे.

सोबतच महापालिका आणि खासगी मिळून असलेले २२ पीएसए प्लांट सुरू करण्यासाठी ‘पेसो’ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता ४१६ मॅट्रीक टन इतकी केली जात असून यात १०० मॅट्रीक टन ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवला जाणार आहे.

जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट येणार का याविषयी शंका वाटू लागली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये रुग्ण संख्या प्रति दिन ६० इतकी आढळत असल्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याचे लक्षात घेत ४१६ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करून ठेवण्याचे नियोजन केले आहे.

त्यात बिटकोतील १९ केएल आणि डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांटला आवश्यक असलेले ‘पेसो’ (पेट्रोलियम अॅन्ड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गेनायझेशन) परवाना प्राप्त झाल्यामुळे महापालिका काहीशी निश्चिंत झाली आहे. मात्र आता खाजगी रुग्णालयात उभारलेले २२ पीएसए प्लांट कार्यान्वित करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. येथून सुमारे २३. २५ मे.टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असून त्यासाठी ‘पेसो’ परवाना आवश्यक आहे.

हा परवाना मिळवण्यासाठी पालिका आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहे. तिसऱ्या लाटेत प्रतिदिन २४० मे. टन ऑक्सिजनची गरज भासेल असा अंदाज आहे. आता गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेत महापालिकेने दुप्पट नियोजन करून ऑक्सीजन प्लांटची क्षमता ४१६ पर्यंत पोहचवली आहे.

१२ हजार ५१८ बेडची व्यवस्था
कोरोना बाधितांवर उपचारासाठी महापालिकेसह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १२ हजार ५१८ बेडस् तयार ठेवण्यात आले असून यात ७१०९ ऑक्सिजन बेडस् तर ६७९ व्हेंटीलेटर्सचा समावेश आहे. तसेच महापालिकेने नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालयात १०० खाटांचे विशेष बाल कोविड कक्ष उभारले आहे. याशिवाय खासगी बाल रुग्णालयांमध्ये उर्वरित तीनशे बेडची व्यवस्था केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...