आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव कोरोना:मालेगावात ३२५ बाधित, नऊ महिन्यांच्या बालिकेला लागण; दिवसभरात आढळले एकूण २८ नवीन रुग्ण

मालेगाव2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोना बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ५९, वाढत्या आकड्यांमुळे पोलीस कर्मचारी धास्तावले

रविवारी दोन टप्प्यात प्राप्त झालेल्या १४७ अहवालांमध्ये ३८ जण पॉझिटिव्ह आढळले. यात एका नऊ महिन्याच्या बलिकेसह २८ नवीन रुग्णांचा समावेश आहे. दाखल दहा रुग्णांचे फेर तपासणी अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात बधितांची संख्या त्रिशतकापार म्हणजे ३२५ वर पोहोचली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, बधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. नव्याने वाढणारी रुग्ण संख्या चिंतेची बाब आहे. जगताप गल्ली, पाट किनारा, कॅम्प, सटाणा नाका भागात कोरोनाचा नव्याने शिरकाव झाला आहे. कालपर्यंत २९८ असलेला बधितांचा आकडा रविवारच्या नवीन २८ रुग्णांमुळे ३२५ वर पोहोचला. १४६ अहवालांपैकी १०८ अहवाल निगेटिव्ह आहेत. तर बाधित २८ मध्ये २४ पुरुष, ३ महिला व नऊ महिन्याच्या बालिकेचा समावेश आहे. रुग्ण वाढीने ५५ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे.

मृत्यू प्रमाण घटले : योग्य उपचारांमुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढून बधितांचा मृत्यू आकडाही घटला आहे. खाजगी रुग्णालये सुरू झाल्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. आठवड्यापासून बधितांचा मृत्यू आकडा १२ वर स्थिर आहे.

पोलिस धास्तावले

कोरोना बाधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येत दोनची भर पडल्याने हा आकडा ५९ झाला आहे. पहिल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील एक कर्मचारी शनिवारी बाधित आढळला. सदर कर्मचारी अहवाल प्राप्त झाला तेव्हा कर्तव्य बजावत होता. वाढत्या आकड्यांमुळे पोलीस कर्मचारी धास्तावले आहेत.

धुळ्यातील एसआरपीचा जवान काेरोनाबाधित

मालेगावला बंदाेबस्तासाठी गेलेला धुळे राज्य राखीव पोलिस दलातील जवानाचा तपासणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतर ८१ जवानांना पोलिस प्रशिक्षण केंद्रात विलग करण्यात आले. धुळ्यातील संख्या आता ३२ वर गेली.

बातम्या आणखी आहेत...