आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांना दिलासा:कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची होणार पुन्हा जेईई-मेन परीक्षा, देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

गणेश डेमसे | नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना पॉझिटिव्ह असलेला रिपोर्ट व अॅडमिट कार्ड एनटीएला मेल करण्याचे आवाहन

देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात राहावे लागत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे सध्या देशभरात जेईई-मेन परीक्षा घेतली जात आहे या परीक्षेला लाखो विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेदरम्यान कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीतही ज्या विद्यार्थ्यांना कोरोना चा संसर्ग झाला आहे. जे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने परीक्षा देऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील आयआयटी व एनआयटी या संस्थांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जॉइंट एंट्रन्स एक्झाम (जेईई मेन्‍स) परीक्षेला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आली असून नाशिकमध्ये १ व २ सप्टेंबर या दोन दिवसात ३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नाशिकमध्ये वडाळारोडवरील आय आॅन डिजिटल, वेब इन्फोटेक, फ्युचर टेक सोल्यूशन, नाशिक टेस्टिंग एजन्सी, पीएसकेएस या पाच केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे. ६ सप्टेंबरपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य असून परीक्षा केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.

एनटीएला मेल करण्याचे आवाहन

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी एनटीए पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांनी ncov19@nta.ac.in या संकेत स्थळावर कोरोना पॉझिटिव्ह असलेला रिपोर्ट व अॅडमिट कार्ड हे अपलोड करून मेल करायचा आहे. विद्यार्थ्यांची लवकरच पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. -डॉ. रोहिणी जोशी, नाशिक समन्वयिका, नॅशनल टेस्टिंग एजन्सी

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser