आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:खासगी प्रयोग शाळांकडून कोविड-19 चाचण्यांचा दर निश्चित करण्यासाठी समिती, काेविड टास्क फाेर्स करणार चाैकशी

नाशिक2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • चाचणी करताना रुग्णाला नेमके काय केले जात आहे याची पुरेशी कल्पना देणे अपेक्षित

भूषण महाले 

'दिव्य मराठी'ने केरोना चाचणीचा खासगी बाजार याकडे लक्ष वेधल्यानंतर काल 2 जून रोजी रात्री  तातडीने मान्यताप्राप्त खासगी प्रयोग शाळांकडून covid-19 चाचण्यांचा दर निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. आरोग्य मंत्री टोपे यांच्या स्वीय सहाय्यक चंद्रकांत थोरात यांनी संबंधित आदेश व्हाट्सअप वर आज पाठवला. या समितीला सात दिवसांचा कालावधी दिला असून ते खासगी प्रयोगशाळांची चर्चा करून दर निश्चित करतील.

काेविड टास्क फाेर्स करणार चाैकशी
कोरोना चाचणी करताना नफेखोरी करणाऱ्या खासगी लॅबची तसेच एकंदरच या सर्व प्रकरणाची सखोल चाैकशी करणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याचे संचालक आणि कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.तात्याराव लहाने यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार यांनी दिली.

‘कोरोना चाचणीचा खासगी बाजार’ या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’ने मंगळवारच्या अंकात कोरोना चाचणीसाठी खासगी लॅबकडून आर्थिक लूट होत असल्याचे स्टिंग ऑपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणले होते. या बातमीमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली. तसेच मुंबईत बंदी असलेल्या काही लॅबला नाशिकमधून नमुने पाठवले जात असल्याचेही या स्टिंगमध्ये समोर आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल शासनाने घेतली असून नागरिकांची दिशाभूल करुन नफेखोरी करणाऱ्या लॅबची सखोल चौकशी करण्यात येईल,असे डॉ.लहान यांनी सांगितले.

डाॅ लहाने म्हणाले की, मुळात ४५०० रुपये घेताना प्रथम स्क्रीनिंग टेस्टसाठी १५०० व शक्यता बळावली तर ३ हजार रुपयांची कन्फर्म टेस्ट करणे अपेक्षित आहे. मात्र ही सर्व कल्पना लाेकांना देणे गरजेचे आहे. नेमकी काेणती चाचणी केली जात आहे याबाबत पुरेशी माहिती न देता घाऊक चाचण्या केली जात असल्याने या गैरप्रकाराची चाैकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तत्काळ चाैकशी करणार

चाचणी करताना रुग्णाला नेमके काय केले जात आहे याची पुरेशी कल्पना देणे अपेक्षित आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ चाैकशी करण्याचे आदेश दिले जातील. डाॅ तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय व शिक्षण तथा अध्यक्ष, काेविड टास्क फाेर्स.

बातम्या आणखी आहेत...