आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डेल्टा प्लस शेाध - जिल्हानिहाय 100 नमुन्यांची चाचणी; राज्यभरात सध्या बाधित 21 रुग्णांत गंभीर लक्षणे नसल्याचा दावा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगावमधील सातपैकी 5 रुग्णांवर घरीच उपचार

राज्यात काेराेनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने बाधित २१ रुग्णांपैकी ७ जळगावमध्ये सापडल्याने नाशिकसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान १०० पाॅझिटिव्ह रुग्णांचे नमुने स्वतंत्रपणे पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात येत अाहेत. अाराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना तशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, राज्यातील एकाही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नसल्याने व त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळल्याने आराेग्य यंत्रणेला दिलासा मिळाला अाहे.

राज्यात अातापर्यंत ७५०० रुग्णांची तपासणी करण्यात अाली असून डेल्टा प्लस व्हेरियंटने बाधित २१ रुग्णांचा पूर्व इतिहास तपासला जात अाहे. विदेशातून ते नेमक्या काेणत्या ठिकाणाहून अाले, त्यांची लक्षणे काय, त्यांनी प्रतिबंधात्मक लस घेतली हाेती की नाही या बाबी तपासल्या जात अाहेत. यासाठी एनडीसीसी, एनअायव्ही या संस्था मदत करत असून अभ्यासाअंती त्यावर उपायांबाबत निर्णय घेतला जाणार अाहे. रुग्णांवरील उपचारातील बदलाबाबत टास्क फाेर्सने सध्या कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही टाेपे यंानी स्पष्ट केले.

नाशिकमधूनही नमुने जाणार
डेल्टा प्लस बाधित रुग्णाच्या फुप्फुसावर परिणाम करून श्वास घेण्यास अडथळा निर्माण करतो. इन्फेक्शन खूप जलदगतीने वाढते. साध्या स्ट्रेनमध्ये इन्फेक्शन वाढले तरी अँटिबाॅडीज ते कमी करायचे. मात्र, डेल्टा प्लस अँटिबाॅडीज न्यूट्रल करून त्याच्यावरच अाघात करताे. प्रतिकारक्षमता कमी असलेल्यांना त्याचा अधिक धाेका अाहे. ज्या तालुक्यात पाॅझिटिव्हची संख्या जास्त अाहे तेथील रुग्णांचे नमुने एनअायव्हीकडे पाठविण्यात येतील. डाॅ. निखिल सैंदाणे,अ. शल्यचिकित्सक

जळगावमधील सातपैकी ५ रुग्णांवर घरीच उपचार
काेराेनाबाधितांचे अाठ ते दहा नमुने नियमितपणे एनअायव्हीकडे जिनाेम सिक्वेंसिंगप्रमाणे तपासणीला प्रत्येक जिल्ह्यातून पाठवण्यात येत अाहेत. त्यामध्ये काेराेना स्ट्रेनच्या स्वरूपात काही बदल हाेत अाहे का, स्ट्रेन नेमके काेणते रूप धारण करीत अाहे याचा अभ्यास केला जात अाहे. त्यातच डेल्टा प्लसचे म्युटंट अाढळून अाले. विदेशात हा स्ट्रेन घातक असला तरी जळगावात सात जणांची प्रकृती स्थिर अाहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने पाठविण्यात आले अाहेत. पाच रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार करण्यात अाले, तर दोघांवर रुग्णालयात उपचार केले.

राज्यात असे आढळून आले रुग्ण

  • रत्नागिरी ९
  • जळगाव ७
  • मुंबई २
  • पालघर १
  • सिंधुदुर्ग १
  • ठाणे १
  • एकूण २१
बातम्या आणखी आहेत...