आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज संस्थेतर्फे कोरोना योध्यांचा सन्मान

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्थेची सभा नाशिक येथील सर्व धर्म मंदिर, तपोवन येथे समाज संस्थेची सभा आणि कोरोना योध्यांचा सन्मानाचा कार्यक्रम अध्यक्ष डॉ. अशोक विनायक दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

जिल्हा समाज संस्थेच्या वतीने आणि अखिल महाराष्ट्र स्वकुळ समाजाचे अध्यक्ष आणि कार्यकारणीच्या सदस्यांच्या हस्ते कोरोना काळात शासकीय, निम शासकीय, खाजगी सेवेत असणार्‍या तसेच व्यक्तीगत पातळी वरील ज्या समाज बंधु भगिनींनी आपल्या जिवाची पर्वा न करता पीडितांना मदत करुन सेवा केली त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. सुरुवातीला भगवान जिव्हेश्वरांचे पूजन आणि आरती करण्यात आली. त्यानंतर कोरोना काळात आणि ह्या वर्षात निधन झालेल्या समाज बंधु भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अध्यक्ष डॉ.अशोक दांडेकर यांचे स्वागत अध्यक्ष गणेश तांबे यांनी केले. त्याच ठिकाणी संस्थेची सभेत राज्यात आलेल्या पुर, वादळ आणि कोरोना काळात संस्थेने संकटग्रस्त समाज कुटुंबांना केलेल्या मदत कार्याविषयी माहिती देण्याबरोबरच संस्थेने स्थापन केलेल्या शिक्षण समितीची कार्यपद्धती आणि कार्यशाळेबाबत शिक्षण तज्ञ श्री. अनिल शहरे यांनी मार्गदर्शन केल. संस्थेच्या उपाध्यक्ष पदी माजी अध्यक्ष सुनिल बाळासाहेब साळी यांची एकमताने निवड करण्यात आली.

या सभेत संस्थेच्या कार्यकारणी सदस्य, तसेच नाशिक शहर स्वकुळ साळी समाज पंचमंडळ, श्री. जिव्हेश्वर प्रबोधन मंडळ, सिडको नाशिक, नाशिक रोड साळी समाज संस्था, सायखेडा येवला, पिंपळगाव (ब), सिन्नर येथील संस्थेचे आजी माजी सदस्य यांनी भाग घेऊन विचार मांडले. सभेचे सूत्रसंचलन अ.म.स्व.सा.संस्थेचे सचिव भालचंद्र साळी, मुंबई, नाशिकरोड साळी समाज संस्थेचे अध्यक्ष सचिन चांगटे व सुनिल ढगे यांनी यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाल्याची माहिती शैलेद्र साळी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...