आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:पाथर्डी परिसरात शिवराज्याभिषेक; दिनी विविध उपक्रमांचे आयोजन

इंदिरानगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा राजीवनगर‌ येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विभागाच्या वतीने लेखानगर शिवतीर्थावर व्यंकटेश मोरे यांच्या हस्ते प्रमुख धारकऱ्यांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवरायांनी हिंदू समाजाला आपण स्वातंत्र्य असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे विशेष महत्त्व असल्याचे मत हिंदुस्थानचे धारकरी सागर देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व धारकरी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवसेना प्रणित मुंबई नाका युवक मित्र मंडळ व जनकल्याण रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात सहभागी झालेल्यांचा माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले चौक मुंबई नाका येथे उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आम्ही रक्त सांडत नाही. आम्ही रक्त गोळा करतो. यानुसार या रक्तदान शिबिरात ४८ शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष विनोद गाडे यांनी केले. यावेळी मंडळाचे शेकडाे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...