आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बीएएमएस'च्या अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जात चुका:'महासीईटी'वर दुरुस्तीचा पर्यायच नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएएमएसच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जासाठी गुरुवार (दि. 5) जानेवारी ही अंतिम मुदत आहे. प्रवेश अर्ज करताना अनेक विद्यार्थ्यांकडून चुका झालेल्या आहेत. मात्र, महासीईटी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्यासाठी पर्यायच (करेक्शन विंडो) उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

निवड यादी जाहीर होण्यापूर्वी संकेतस्थळावर प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याची मागणी नाशिकसह राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

5 जानेवारी शेवटची मुदत

बीएएमएसच्या पदवी परीक्षानंतर पीजीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 डिसेंबरपासून प्रवेश अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. 5 जानेवारी ही अर्जासाठी शेवटची मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची मोठी कोंडी

मात्र अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांकडून चुका झालेल्या आहेत. मात्र, प्रवेश अर्जात दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना पर्यायच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवर्ग तसेच इतर माहिती चुकीची भरली गेल्याने त्याचा परिणाम स्टेट मेरिट लिस्टवर होऊ शकतो.

दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास ज्या विद्यार्थ्यांकडून योग्य प्रकारे माहिती भरता येऊ शकेल. राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता असल्याने सीईटी सेलने विद्यार्थ्यांनी हित लक्षात घेऊन संकेतस्थळावर दुरुस्तीसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

दुरुस्तीचा पर्याय सुरु करा

नाशिक मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडून प्रवर्ग व शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती भरताना चुका झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी सीईटी सेलने प्रवेश अर्जाच्या विहित मुदतीत वाढ करावी. तसेच दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...