आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन प्रश्न सुटणार?:नाशिकमधील डिझेल तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज बोलावली बैठक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यात निर्माण झालेला डिझेलचा तुटवडा दूर करण्यासाठी आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर यांनी थेट इंधन पुरवठादार कंपन्यांच्या स्थानिक वरिष्ट अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी 4 जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार असल्याने सायंकाळी नंतर डिझेल पुरवठ्याचा प्रश्न सुटू शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बैठकीला बीपीसीएल कंपनीच्या (भारत पेट्रोलियम) टेरिटोरी मॅनेजरसह जिल्ह्यातील इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम) यांसह इतर इंधन पुरवठा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आले आहे. यात डिझेल चा नेमका प्रश्न काय आहे? कशामुळे डिझेल पुरवठा केला जात नाही किंवा का साठा अपुरा पडत आहे याचा याचा शोध घेऊन तो कमी पडू नये याबाबत योग्य नियोजन केले जाईल, असेही पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी दुपारपासून बऱ्यापैकी डिझेलची उपलब्ध करण्यात येत असल्याचे ही सांगण्यात आले असून, आगामी दोन दिवसांमध्ये ही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...