आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्बंध कठोर:​​​​​​​आंतरजिल्हा प्रवास करताना इ-पास आवश्यक, मिळणार संकेतस्थळावर

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यातील चेकपोस्टवर पोलिस बंदोबस्त तैनात

राज्यात कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या काळात जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी इ-पास लागणार आहे. यासाठी ग्रामीण पोलिस दलाने संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. या आधारे इ-पास वितरीत करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संचारबंदी आणि जमावबंदी लागू आहे. अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी वगळता इतर कुणालाही बाहेर पडता येणार नाही. अशा परिस्थितीत आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी इ-पासची पुन्हा तरतूद करण्यात आली आहे.

कुणाला मिळेल इ-पास
कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह इ-पाससाठी अर्ज करू शकतो. विवाहसोहळा, अत्यावश्यक आरोग्य इमर्जन्सी, अंत्यविधीसाठी इ-पास मिळतो. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी इ-पास आवश्यक नाही.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे
लॉकडाऊन निर्बंध आणखी कठोर करण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आंतरजिल्हा बाहेर जाण्यासाठी इ-पास अनिवार्य करण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाताना शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून इ-पास घ्यावा. शक्यतो बाहेर पडणे टाळावे. - सचिन पाटील, अधीक्षक, ग्रामीण पोलिस दल

असा काढा इ-पास
इ-पाससाठी https:/covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जावे. आधी सर्व सूचना वाचून घ्याव्यात. apply for pass here यावर क्लिक करा. ज्या जिल्ह्यात प्रवास करायचाय तो जिल्हा निवडा. जिल्हा किंवा पोलिस आयुक्तालय निवडा, संपूर्ण नाव, प्रवास कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत करणार, मोबाइल नंबर नोंदवा. प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश नोंद करा. वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि इ-मेल नोंद करा. प्रवासाला सुरुवात कोठून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नोदवा. आपण कटेंन्मेंट झोनमधील आहात का? होय अथवा नाही ते द्या. परतीचा प्रवास याच मार्गाने करणार, ते सांगा २०० केबीपेक्षा लहान साइजचा फोटो अपलोड करा. आवश्यक ती कागदपत्रे निवडा.अर्ज सबमिट करा. अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी तुम्हाला देण्यात येईल. पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही टोकन आयडी क्र. नोंदवून इ-पास डाऊनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या. इ-पासची मूळ कॉपी आणि झेरॉक्सही स्वत:कडे ठेवा.

ग्रामीण चेकपोस्टवर बंदोबस्त तैनात
घाटनदेवी, आंबोली, वावी, नांदूरशिंगोटे, कोपरगाव सीमा, अंदरसूल, चाळीसगाव सीमा, झोडगे फाटा, सटाणा, ताहाराबाद, बोरगाव, सापुतारा सीमा, पेठ, बलसाड, हरसूल, धरमपूर, वैजापूर, सुरेगाव, या चेकपोस्टवर अशा आंतरजिल्हा १८ सीमा आणि अांतरराज्य ८ चेकपोस्टवर ४० अधिकारी २ हजार कर्मचारी, १ हजार होमगार्ड आणि एस. आर. पी. एफ. बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...