आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लिंक पाठवत क्रेडिट कार्डचे क्लोन बनवत 90 हजारांचा गंडा; वीज खंडितचा संदेश पाठवत फसवणुकीचा फंडा

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलवर वीज जोडणी कट करण्याचे मेसेज आला तर सावध व्हा. अशाच प्रकारे मुंबई येथील रहिवाशी बस प्रवास करत असताना. मोबाइलवर मेसेज पाठवत अनोळखी ॲप डाऊनलोड करण्यास सांगत क्रेडिट कार्डचे क्लोन तयार करत त्याद्वारे ९० हजारांचा गंडा घासण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि रविकांत काळे रा. बाजार स्ट्रीट फोर्ट मुंबई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ मे रोजी मुंबईहून त्रंबक येथे आले होते. त्र्यंबकेश्वर येथून नाशिकरोड रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी बस प्रवास करत असताना द्वारका येथे मोबाइल वर मेसेज आला. तुमचे वीज बिल थकीत आहे.

काही वेळात वीज जोडणी कट केली जाईल असा मेसेज आला. मेसेजच्या खाली संपर्क नंबर दिला होता. काळे यांनी त्या अनोळखी नंबर वर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव दीपक शर्मा असे सांगितले. तुमचे वीज बिल थकीत असून तुम्ही बिल भरले नाही तर जोडणी कट केली जाईल असे सांगत तुम्ही आत्ता बिल भरले तर कारवाई थांबवली जाईल असे सांगत विश्वास संपादन केला.

काही वेळात मोबाईल वर ‘टीम व्हीवर क्विक सपोर्ट ॲप’ ची लिंक पाठवत ती लिंक डाऊनलोड करण्यास सांगितले. काळे यांनी सदरील ॲप डाऊनलोड केले. ॲप ॲक्टिवेट करण्यासाठी १० रुपये ऑनलाईन पेमेंट पाठवण्यास सांगितले. काळे यांनी ॲप डाऊनलोड केलेल्या ॲप वर एसबीआय क्रेडिट कार्ड ची माहिती दिली. तसेच बँक खाते ची माहिती अाॅनलाईन भरली. संशयिताने खाते हॅक करत बँक खात्यातून क्रेडिट कार्डचा वापर करत ऑनलाईन ९० हाजार ३३८ रुपयांची खरेदी केली. अशी तक्रार काळे यांनी पोलिसांत दिली.वरिष्ठ निरीक्षक सुनील रो होकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...