आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगरटाकळी येथे आपल्या रहात्या घरातील पाण्याच्या हौदात 200 ते 300 किलो मांगुर जातीचे उत्पादन घेणाऱ्यावर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी वि अ लहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित असलेले मांगुर जातीच्या मासे चे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती विभागाला समजली. त्यानुसार पोलीसांच्या सहाय्याने आगरटाकळी येथील संशयित आरोपी किशोर काशिनाथ आडणे याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी आडणे याच्या घरातील पाण्याच्या हौदेतून 200 ते 300 किलो मांगुर जातीचे मासे आढळुन आले.
याची बाजारात सुमारे 18 हजार रुपये किंमत आहे. पंरतू मागुर जातीचे मासे हे नैसर्गिक साखळीला अडचणीचे ठरत असतात. म्हणुन त्यांच्या विक्रीवर बंदी आहे. आडणे हा गत चार ते पाच वर्षापासुन मागुर मासेंची विक्री करीत असुन ते ओढा आणि एकलहरे परिसरातुन खरेदी करीत होता. त्यानंतर नाशिकच्या बुधवार बाजारात त्याची विक्री करीत होता. त्याच्या विरोधात सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प.शि.काळे, गणेश गोसावी, सुदाम झाडे यांनी कारवाई केली.
का आहे मागुरवर बंदी
मांगुर ही मासेची जात विदेशी असुन तो अति मांसाहारी आहे.त्यामुळे तो ज्या पाण्यात वास्तव्य करीत असतो, त्या पाण्यातील स्थानिक मासे नष्ट होतात, तसेच नैसर्गिक जैवविविधतेवर त्याचा परिणाम होतो.त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असते. तसेच भारतीय मागुरच्या खाद्याची कमतरता निर्माण होवुन भारतीय मागुरवर त्याचा परिणाम होतो.बहुतांश ठिकाणी मांगुरचे मस्त्यसंवर्धन करीत असतांना मेलेल्या कोंबड्या किंवा उरलेले चिकन टाकले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.