आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खाद्यतेलाचा पुनर्वापर केल्यास गुन्हा, कारवाईचा इशारा ; तेलाचे अनेक नमुने पॉझिटिव्ह

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटेलमध्ये एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर केला जाता. स्वत: अन्न प्रशासन विभागाने घेतलेल्या ६८ नमुन्यांमध्ये अनेक नमुने पॉझिटिव्ह आले. तेलाच्या पुनर्वापरामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारासह आराेग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. तेलाचा पुनर्वापर करणे कायद्याने गुन्हा असून अशा हॉटेल आस्थापनांवर कारवाई करण्याचा इशारा अन्न प्रशासन विभागाने दिला आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे महत्त्व खूप जास्त आहे. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि चवदार बनते. अनेक घरांत तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते. पण एकदा वापरून झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आरोग्याला घातक ठरू शकतो. असे वापरलेले तेल बायाेडिझेल तयार करणाऱ्यांना विकता येते. त्यामुळे तेलाचा पुनर्वापर टाळण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त गणेश परळीकर व विवेक पाटील यांनी केले आहे. एकदा वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. असे असताना हॉटेलमध्ये या तेलाचा सर्रास वापर केला जातो. उकळलेल्या तेलातील टोटल पोलर इंडेक्स (टीपीसी) हा २५ डिग्रीपेक्षा कमी असावा. २५ डिग्रीपेक्षा जास्त असल्यास तेल तळण्यासाठी वा खाण्यासवाठी योग्य ठरत नाही. अशा तेलाचा पुनर्वापर न करता बायोडिझेलची निर्मिती करणाऱ्या कंपनीला विकावे, असा अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियम आहे. तेल कितीवेळा वापरावे? हॉटेलपेक्षा हातठेल्यावर खाद्यपदार्थ स्वस्त असल्यामुळे अनेकजण उघड्यावर समोसे, कचोरी आणि इतर पदार्थ आवडीने खातात. या ठिकाणी तेलाचा अनेकदा पुनर्वापर केला जातो. तेलाचा रंग काळा पडेपर्यंत त्याचा वारंवार वापर केला जातो. उकळलेले तेल तळण्यासाठी दोन किंवा तीनदा वापरावे, असे निर्देश असताना तेल परत-परत वापरले जाते. या तेलातील पदा‌र्थ आराेग्यास हानिकारक ठरतात.

काळसर तेलात तळलेले पदार्थ हानिकारक काळसर तेलातून तळलेल्या पदार्थांमुळे अनेकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक असतो. एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर कॅन्सर, ॲसिडिटी, हृदयासंबंधित आजार, अल्झायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

५ महिन्यांत तपासले ६८ नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने पाच महिन्यांत तेलाचे ६८ नमुने घेतले हाेते. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता त्यापैकी काही नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली.

तेलाचा पुनर्वापर केल्याचे आढळल्यास हॉटेल्सवर कारवाई अन्न प्रशासन विभागाकडील नोंदणीकृत हॉटेल व उपाहारगृहांनी तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तेलाचा पुनर्वापर करू नये. असे आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा सहायक आयुक्त गणेश परळीकर व विवेक पाटील यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...