आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणाच्या प्रेमात पडले वाकडे पाऊल:19 वर्षाच्या मुलाकडून 15 वर्षीय मुलगी गर्भवती, बिंग फुटताच तिला सोडून प्रियकर पसार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोवळ्या वयात प्रेमसंबध निर्माण झाल्यानंतर काय गं‌भीर प्रकार होतात याची कल्पना नसल्याने अल्पवयीन मुली अजानतेपणी आपले आयुष्य अंधारात लोटत आहेत, असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईनाका परिसरात उघडकीस आला. 19 वर्षीय मुलाने 15 वर्षाच्या मुलीला कोर्ट मॅरेज करण्याचे अमिष देत तिच्यासोबत शारीरीक संबध ठेवले. तिला गर्भवती केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार देत संशयित पळून गेला.

संशयितावर गुन्हा

संशयित विवेक भाऊसाहेब निकम (वय 19, रा. शिवाजी वाडी) याच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच महिन्यांची गर्भवती

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलीचे परिसरातील राहणाऱ्या मुलासोबत शाळेत असल्यापासून प्रेमसंबध होते. संशयिताने मुलीला आपण कोर्ट मॅरेज करु असे आमिष दिले. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी शारीरीक संबध ठेवले. या संबधातून मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहली.

त्याने केले पलायन

मुलगी गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर संशयिताने लग्न करण्यास नकार देत पळून गेला. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

बालवयातील प्रेमाचे भविष्य अंधकारमय

पीडित मुलगी 10 वर्षाची तर संशयित हा 14 वर्षाचा असल्यापासून प्रेमसंबध होते. पाच महिन्यापुर्वी मुलगी गर्भवती राहिली. कुटुंबियांना हा प्रकार लक्षात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कायदेशीर दृष्ट्या अडचण

संशयिताचे आणि मुलीचे लग्नाचे वय नाही. यामुळे संशयितासोबत लग्न करण्यास कायदेशीरदृष्ट्या असमर्थ आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने गर्भपात करण्यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल असणे आवश्यक आहे. मात्र, मुलीने गर्भपात करण्यास नकार दिल्याने पोलिसांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे.

मुलीचा वैद्यकीय चाचणीला नकार

पीडित मुलीने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला. माझे बाळाचे बरे वाईट होईल या भीतीने मुलीने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिल्याने कुटुंबियांपुढे मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...