आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पाच वर्षांमध्ये नाशिक महापालिकेच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपयांचे रस्ते झाले. त्यातील बहुतांश रस्ते खड्ड्यात गेल्याचा मुद्दा ‘दिव्य मराठी’ने उपस्थित केल्यानंतर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ताे मुद्दा प्रकर्षाने मांडत आक्रमक पवित्रा घेतला आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षांत रस्त्यांच्या कामांकरिता ४८९.७२ कोटी खर्च करण्यात आला असून दैनंदिन कामांचे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्थ संस्था नेमणुकीची प्रक्रिया नाशिक महापालिकेमार्फत सुरू असल्याचे त्यांना लेखी उत्तर दिले.
पालिकेने गेल्या अडीच वर्षात रस्त्यांच्या कामासाठी सुमारे साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनदेखील साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून देखील पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील रस्त्याच्या कामांची गुणवत्ता दर्जाहीन असल्याबाबत पालिकेला असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी बांधकाम विभागासह गुणवत्ता नियंत्रण विभागाची असल्यामुळे शासनाने या तक्रारींची चौकशी केली आहे काय? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे विविध संघटनांकडून महानगरपालिकेस निवेदने प्राप्त झाली असून, याबाबत आंदोलने झाल्याची बाब खरी आहे. मागील तीन वर्षांत रस्त्यांच्या कामांकरिता एकूण रु.४८९.७२ कोटी खर्च झाला आहे. रस्ते खोदकामावर पालिकेने फोडले खापर : सद्यस्थितीत भुयारी गटारींची कामे, पाणीपुरवठ्याची कामे, भूमिगत एमएनजीएल गॅस पाइपलाइन, रिलायन्स, एअरटेल, जिओ फायबर इत्यादी कंपन्यांचे केबल नेटवर्किंगची कामे यामुळे अनेक रस्त्यांवर खोदकामे सुरू असल्याचे कारण देत पालिकेने हात वर केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.