आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा!:अखेर जलवाहिन्यांची क्रॉस जोडणी पूर्ण; आजपासून सुरळीत होणार पाणीपुरवठा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांसह दिवसरात्र काम केल्याने रविवारी (दि.28) सायंकाळी 7.30 वाजता क्रॉस जोडणीचे काम पुर्ण झाले.

नागरिकांनी केले समाधान व्यक्त

आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दुरुस्ती सुरू असलेल्या ठिकाणाला भेट देऊन आढावा घेतला असता रात्रीपासून कमी दाबाने व सोमवार पासून पुरवठा पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मनपाने काढलेल्या पर्यायी उपाय योजनेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही

पपया नर्सरी येथील पोलीस चौकीच्या मागे व सिग्नलच्या पुढील वडाच्या झाडाजवळ डीआयएमएस पाईपलाइनवर क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हळूहळू पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. अमृत गार्डन येथील जुन्या सिमेंट जलवाहीनीवर पाण्याचा प्रेशर येऊ नये यासाठी 300 मिमी व्यासाच्या डीआय एमएसच्या पाइपलाईनवर दोन व्हॉल्व लावण्यात आले. या व्हॉल्वमुळे प्रेशर नियंत्रण होणार असून भविष्यात सीमेंटची जलवाहीनी नादुरुस्त झाल्यास सातपूर परिसरासह सिडको व पश्चिम नाशिक परिसराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही.

बायपासव्दारे केला पाणीपुरवठा

अमृत गार्डन चौकाच्या परिसरातील नादुरुस्त झालेल्या 1200 मि.मि. व्यासाच्या जलवाहीनीचे काम करणे धोक्याचे झाले होते. 25 फुट जमीनीखाली असलेली सिमेंट जलवाहीनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात सारखे पाणी साचत आहे. त्यामुळे हे काम संथ गतीने करून पपया नर्सरी परिसरात असलेल्या लोखंडी जलवाहीन्यांना रात्रंदिवस युध्दपातळीवर काम करत क्रॉस जोडणी करून बायपासव्दारे नागरीकांना पाणी देण्यात आले.

ड्रिल टेस्टमुळे सिमेंटची जलवाहीनी फुटल्याची शक्यता

जमीनीचा पोत पाहण्यासाठी हेवी डेनसिटी ड्रिल टेस्ट तसेच विविध प्रकारच्या टेस्ट करण्यात येतात. ही टेस्ट करताना जलवाहीनी फुटली असल्याची शक्यता मनपाच्या सुत्रांनी व्यक्त केली. अमृत गार्डन मधील 1200 व्यासाच्या जलवाहीनी तीन ठिकाणी फुटलेली असल्याचे निदर्शनास आले.

बातम्या आणखी आहेत...