आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लंघन:पंपावर विनाहेल्मेट चालकांची गर्दी, आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन

इंदिरानगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुढीपाडव्यापासून शहरात पुन्हा दुचाकीवरील दोघांना हेल्मेटसक्ती करत विनाहेल्मेट चालकास पेट्रोल देणाऱ्या पंपचालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. या आदेशानंतरही इंदिरानगर भागातील पंपावर सर्रासपणे हेल्मेट नसणाऱ्यांनाही पेट्रोल दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एकीकडे शहरात वाहतूक पोलिसांकडून दिवसभर विनाहेल्मेट चालकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असताना महामार्गावरील काही पेट्रोलपंपचालकांकडून मात्र विनाहेल्मेट दुचाकीचालकांना सर्रासपणे पेट्रोल दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंपावरील कामगारांनी काेणत्याही दुचाकीस्वारास कुठलीही मनाई न करता पेट्रोल दिले जात असल्याचे चित्र दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...