आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाळके स्मारक गुरुवारपासून महापालिकेच्या स्वतःच्या हिमतीवर खुले करण्यात आले. दरम्यान, यानंतरचा पहिल्याच रविवारी हे स्मारक व परिसर अक्षरश: नाशिककरांनी फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले. तब्बल अडीच वर्ष हे स्मारक बंद होते. येथील उद्यान ऑडिटोरियम, उसळणारे मनमोहक कारंजे यांसारख्या तसेच महत्त्वाची दालने खुली झाल्याने शहरवासियांनी कुटुंबीयांसह येथे मोठी गर्दी केली हती. विशेष म्हणजे, स्मारक सुरू केल्यानंतरचा या पहिल्याच रविवारी प्रवेश मोफत दिला गेला.
पालिकेने १९९९-२००० मध्ये त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत फाळके स्मारकाची उभारणी केली. मात्र, दुरवस्था झाल्याने हळूहळू पर्यटकांनी इकडे पाठ फिरवली. त्यातच कोरोनाचा बिकट काळातील निर्बंधही होतेच. दुसरीकडे या प्रकल्पामुळे दरवर्षी किमान ५५ लाखांचा तोटा पालिकेला होत. ही बाब गांभीर्याने घेत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या स्मारकाच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला गेला. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी.आर्ट आर्ट वर्ल्ड या कंपनीला ३० वर्षांच्या कराराने देण्याचा निर्णयही झाला होता मात्र हा करार पालिकेच्या मुळावर येणार असल्याचा आक्षेप लेखापरीक्षकांनी घेतल्याचे लक्षात घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हा प्रकल्प पालिकेमार्फत चालविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त पवार यांनी गुरुवारपासून हा प्रकल्प खुला केला होता.
कारंजे बच्चे कंपनीचे आकर्षण
तीन कारंजापैकी एक कारंजा पहिल्या टप्प्यात सुरू झाला आहे. बच्चे कंपनीचे हे प्रमुख आकर्षण आहे. महत्त्वाचे म्हणजे, दुसरा संगीत कारंजा देखील लवकरच सुरू केला जाणार आहे. वॉटर पार्क मात्र दहा वर्षांच्या करारावर ठेकेदाराला दिला जाणार असून त्या संदर्भात अटी शर्ती व निविदेची काम सुरू आहेत. नाममात्र दरामध्ये फाळके स्मारकात प्रवेश येथे पर्यटकांना मिळतो.
नाशिककरांनी अवश्य भेट द्यावी
^महापालिकेने फाळके स्मारक पुन्हा एकदा शहरवासीयांसाठी खुले केले आहे. बराच काळ त्याकडे दुर्लक्ष झाले हाेते. मात्र, आता स्मारक पुन्हा एकदा नाशिककरांना येथे भेट द्यायला उत्तम ठिकाण बनले आहे. शहरवासियांनी जरूर या प्रकल्पाला भेट द्यावी. -रमेश पवार, आयुक्त, महापालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.