आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:द्वारका येथील केंद्रात गर्दी वाढली; 2 महिन्यांत केला कामाचा निपटारा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जम्बो आधारकार्ड केंद्रात 12 हजार कार्ड नोंदणी

केंद्र सरकारच्या यूआयडीएआयतर्फे द्वारका परिसरात जम्बो आधारकार्ड केंद्र कार्यान्वित झाले आहे. तेथे एका दिवसात सुमारे पाचशे आधारकार्ड नोंदणी व अद्ययावत केले जात आहे. दोन महिन्यात या केंद्रात १२ हजार आधार कार्ड नोंदणी व अद्ययावत करण्यात आले.

सरकारतर्फे पूर्वी विविध ठिकाणी सुरू केलेले आधार कार्ड केंद्र बंद झाले आहेत. ठराविक ठिकाणीच आधार कार्ड केंद्र सुरू आहेत. नागरिकांना नवीन आधार कार्ड काढायचे असल्यास किंवा अद्ययावत करावयाचे झाल्यास त्या केंद्रांचा शोध घ्यावा लागतो. त्यानंतर आधार कार्ड संबंधित कामे केली जातात. केंद्र सापडल्यानंतरही त्याठिकाणी नागरिकांची असलेली गर्दी, कामांना लागणारा वेळामुळे नागरिकांचा बराच वेळ वाया जातो.

शिवाय त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. केंद्रात एका दिवसात ३० ते ४० नवीन आधार कार्ड काढणं किंवा अद्ययावत केली जातात. त्यामुळे नागरिकांच्या आवश्यक कामांचा खोळंबा होतो. नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारतर्फे केंद्र सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागार्फे जम्बो आधार कार्डकेंद्र द्वारका भागातील जानकी प्लाझा याठिकाणी सुरू झाले आहे. तेथे पुरेसे संगणक आणि कर्मचारी आहेत. केंद्रात येणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्थाही आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांची सोय होत आहे. नागरिकांना आधारकार्ड संबंधित कुठल्या तक्रारी किंवा शंकांचे निरसन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...