आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:; सुरक्षेच्या कारणास्तव अनेक जणांना फिरावे लागले माघारी

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमत्त नाशिकरोड येथे भारतप्रतिभूमी मुद्रणालयाच्या वतीने दुर्मिळ भारतीय नोटांचे प्रदर्शन ८ ते १० जूनदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी व शुक्रवारी हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. परंतु गुरुवारी नागरिकांची सकाळपासून गर्दी झाली होती, दुपारनंतर गर्दीमध्ये वाढ झाल्याने अनेकांना माघारी परतावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारतप्रतिभूमी मुद्रणालयाच्या वतीने जेलरोड येथील प्रेसच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात दुर्मिळ नोटांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये नाशिकरोड येथील नाेटप्रेसमध्ये छापलेल्या पहिल्या नोटेपासून ते आतापर्यंतच्या नोटेपर्यंतचा इतिहास मांडण्यात आला हाेता. एक रुपयांपासून ते १० हजार रुपयांची नोट, नोटांचे आकार, इंग्रजाच्या काळातील नोटा, त्यावरील राजाचे फोटो, गव्हर्नरची स्वाक्षरी, वर्ष अशी सर्व माहिती यावेळी देण्यात आली होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या नोटा पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र सुरक्षेमुळे कडकोट बंदोबस्त असल्याने नागरिकांना प्रवेशद्वारावरच बराच वेळ प्रतीक्तिषा करावी लागत होती, त्यानंतर प्रदर्शनस्थळी जावुन बराच वेळ रांगेत उभे रहावे लागत असल्याने अनेकांनी न पहाताच परतावे लागले. तर गर्दीचे कारण सांगुन सांयकाळी पाचलाच प्रवेश बंद करावा लागला होता.

बातम्या आणखी आहेत...