आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:जीवनात यशप्राप्तीसाठी संस्कार महत्त्वाचे ; माजी शिक्षिका सुनीता गायधनी यांचे प्रतिपादन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेने केलेले संस्कार नेहमीच उपयोगी पडतात त्यातून विविध आदर्श निर्माण होतात म्हणजेच जीवनात यशस्वितेसाठी संस्कार महत्त्वाचे असतात, असे प्रतिपादन माजी शिक्षिका सुनीता गायधनी यांनी केले.नाएसाेच्या मा. रा. सारडा कन्या विद्यामंदिर शाळेत शाळेच्या देणगीदार कै. मातोश्री रामप्यारीबाई सारडा आणि माजी मुख्याध्यापिका कै. लीलाताई ठकार यांचा स्मृतिदिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गायधनी बाेलत हाेत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर होते.

व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर, कार्यवाह राजेंद्र निकम, मुख्याध्यापिका प्रियंका निकम आदी उपस्थित होते. स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या शाळेच्या नामवंत माजी विद्यार्थिनी शिल्पा मिलिंद सबनीस, वृषाली मिनल चौधरी, डॉ. रश्मी शेखर आमले, डॉ. शलाका दिलीप शिंदे, शुभदा नवीन तांबट, अश्विनी अतुल गरगडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन स्नेहल आपटे यांनी तर आभार उपमुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी मानले. भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...