आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Customers Should Bill The Goods In The Shop; Appeal To Consumer Consumer Protection Workshop Conducted By Social Foundation Marathi News

बिल घ्या फसवणूक टाळा:ग्राहकांनी दुकानात वस्तूचे बिल घ्यावे; सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण कार्यशाळेत आवाहन

सातपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी कोणताही व्यवहार करताना कायदेशीररीत्या करावा. दुकानात खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूंचे बिल घ्यावे, असे आवाहन ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या कार्यशाळेत करण्यात आले. सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. सामान्य ग्राहकांना आपल्या हक्कांविषयी माहिती नसल्याने त्यांची अनेक ठिकाणी अडवणूक व फसवणूक होते. अशा ग्राहकांसाठी माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तर्फे कार्यशाळा घेण्यात आली. ग्राहकांनी व्यवहार करताना वस्तूंची पावती घेऊन कायदेशीर व्यवहार करावा असे आवाहन अॅड प्रेरणा काळुंखे व दिलीप फडोळ यांनी करतानाच ग्राहकांच्या हक्काविषयी माहिती दिली. कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्यांतून प्रतिनिधी आले होते. सूत्रसंचालन कुणाल भोसले यांनी तर आभार योगेश मालुजकर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...