आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभूमी शब्दबद्ध:‘सायक्लाेरामा’ हा नाशिकच्या रंगभूमीचा ऐतिहासिक ठेवा, ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची रंगभूमी शब्दबद्ध करणे हे कमालीचे अवघड काम आहे. गेल्या कित्येक वर्षांत असे काम झालेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे यांनी ‘सायक्लाेरामा’ पुस्तकाच्या निमित्ताने हे ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. शहराच्याच नव्हे तर मराठी नाट्यसृष्टीच्या दृष्टीने ही अत्यंंत माेलाची गाेष्ट असल्याचा सूर मान्यवरांनी काढला.

नम्रता कलाविष्कार या नाट‌्यसंस्थेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे यांच्या अमृतमहाेत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शनिवारी (दि. 11) कुसुमाग्रज स्मारकातील सभागृहात ढवळे यांनी लिहिलेल्या ‘सायक्लाेरामा’ या पुस्तकाचे प्रकाशन हेमंत टकले, लाेकेश शेवडे, नितीन हिरवे, उपेंद्र दाते, प्रकाश अकाेलकर, माेहन साटम, सुषमा देशपांडे, दत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ रंगकर्मी तसेच ढवळे यांच्या मित्र परिवाराने नाटकाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मराठी रंगभूमीच्या इतिहासात हे पुस्तक महत्त्वाचे

यावेळी हेमंत टकले म्हणाले की, ढवळे यांच्या हृदयात रंगमंच कायम आहे. ते एक पुजारी आहे. पुजारी अशी मंदिरातील अवधानं साभाळत असताे. तसे काम ढवळे करत असतात. काेणीतरी नाट्यवेडाच अशी गाथा सांगत असताे. हे सांगण्याची उर्मी ढवळे यांनी या पुस्तकरुपाने दाखवली. रंगभूमीवरील अनेक स्थित्यंतरं त्यात येतात. मराठी रंगभूमीच्या इतिहासात हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे.

अभ्यासकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक

तर अनंत येवलेकर म्हणाले की, वामनराव पुराेहित यांनी 1962 मध्ये असे एक पुस्तक लिहिले. त्यानंतर एवढ्या माेठ्या काळाने असे पुस्तक येणे म्हणजे हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे पुस्तक खराेखरंच वाचनिय आहे. त्यातील ऐवज हा रसरशित आहे. अभ्यासकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक ठरणार आहे. अनेक घटना आपण फक्त सांगू शकताे. मात्र त्या उतरविण्याचे एक धारिष्ट्य लागते ते ढवळे यांनी केल्याचे येवलेकर म्हणाले.

अवकाशाला टेकण्यासाठी एक क्षितीज हवे

लाेकेश शेवडे म्हणाले की, हे पुस्तक वाचनाता ते लिहिले आहे​​​​​​ आणि ते आपण वाचताे आहे, असे वाटत नाही तर काेणीतरी आपल्याला सांगताेच आहे असे वाटते. एवढे साधे, सरळ आणि साेपे त्यांनी लिहिले आहे. वाचकाच्या रंजनासह हे एक महत्त्वाचे डाॅक्युमेंट ठरणार, असेही त्यांनी व्यक्त केले. तर अवकाशाला टेकण्यासाठी एक क्षितीज हवे असते. ते म्हणजे सायक्लाेरामा आहे, असे दत्ता पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रकाशक नितीन हिरवे, माेहन साटम, प्रकाश अकाेलकर यांनीही मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अरुण भावसार यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेश टाकेकर, नंदकुमार देशपांडे, हरिक्रिष्ण डिडवाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचलन भावना कुलकर्णी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...