आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा सॅल्यूट:सायकलप्रेमी अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीला सायकलिस्टचा सलाम; नाशिक ते साेलापूर केला प्रवास

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सायकल कॅपिटल अशी ओळख निर्माण झालेल्या नाशिकमध्ये सायकल चळवळ रुजविण्यात महत्त्त्वाची भूमिका निभावणारे साेलापूरचे पाेलिस आयुक्त हरीश बैजल नुकतेच सेवानिवृत्त झाले. या सायकलप्रेमी अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त नाशिक ते साेलापूर असा सायकल प्रवास करत नाशिक सायकलिस्टनी त्यांच्या कार्याचा गाैरव केला.

कर्तव्यदक्ष पाेलिस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीष बैजल यांना सायकलिंगची विशेष आवड आहे. पर्यावरण व आराेग्यसंवर्धनसाठी प्रत्येकाने सायकल चालवली पाहिजे यासाठी ते नेहमी जनजागृती करत असतात. त्याच्या पुढाकारातूनच शहरात नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनची स्थापना झाली हाेती, असे सायकलप्रेमी बैजल हे नुकतेच साेलापूर पाेलिस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पोलिस दलातील सेवा कार्यास अनोखा सॅल्यूट देण्यासाठी नाशिक सायकलिस्टसच्या डॉ. मनीषा रौंदळ, नरेंद्र कंसारा, रतन अंकोलेकर, रामदास सोनवणे, अनुजा उगले व अनुज उगले या सायकलिस्टने 30 मे सकाळी 5.30 वाजता नाशिक येथून सायकल प्रवास सुरू केला.

नांदुर-शिंगोटेजवळ संगमनेर सायकलिस्टने स्वागत केले. राहुरी येथे राहुरी सायकलिस्टने स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. दौंड येथे रात्री मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सायकलिंगला सुरुवात केली. रणरणत्या उन्हावर मात करून सोलापूर गाठले. पोलिस आयुक्तालय सोलापूर येथे पोहोचताच सर्वजण एवढा मोठा सायकल प्रवास बघून थक्क झाले. सर्व सायकलिस्ट बैजल यांनी स्वागत केले. पोलिस आयुक्तालयात आयोजित केलेल्या सेवापूर्ती कार्यक्रमात या सर्व सायकलिस्ट नी त्यांना सलाम करत त्याच्या कार्याचा गाैरव केला.

बातम्या आणखी आहेत...