आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आझादी का अमृत महोत्सव':नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाकडून सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन, उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक प्राप्तीकर विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे औचित्य साधत सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सीए, कर सल्लागार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच नाशिक सायकल फाऊंडेशनच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला

अनंत कान्हेरे मैदानावरून सकाळी साडेसहा वाजता ही सायक्लोथॉनचा सुरू झाली. तेथून सीबीएस रविवार कारंजा निमाणी रामवाडी मार्गे प्राप्तीकर कार्यालय येथे या स्पर्धेचे समारोप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त प्रवीण कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास मुख्य आयकर आयुक्त यशवंत चव्हाण, पुणे येथील आयकर आयुक्त संग्राम गायकवाड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, बीएसएनएलचे जनरल मॅनेजर नितीन महाजन, वस्तू व सेवा कर विभागाच्या संयुक्त आयुक्त अनुश्री हर्डीकर,नाशिक सायकल फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे किशोर कार्य प्रसिद्ध सायकलपटू जितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन उपस्थित होते देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिवीरांचे स्मरण या स्पर्धेत नियुक्त करण्यात आले

बातम्या आणखी आहेत...