आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक:सारडा सर्कलवर रहदारीत विद्यार्थ्यांची रोजच ‘परीक्षा’

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारडा सर्कल परिसरातील रस्त्यावर असलेल्या नॅशनल उर्दू हायस्कूल व महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोजचा प्रवास हे एक दिव्यच आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीसांची नेमणूक नसल्याने वाहतूक कोंडीसह अपघातात वाढ झाल्याचे चित्र आहे. सारडा सर्कल हा शहरात प्रवेश करण्याचा मार्ग असल्याने या ठिकाणी कायम वर्दळ असते. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना येथून जीव मुठीत धरून मार्गाक्रमण करावे लागते. यापूर्वी रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले आहेत.

शाळा-महाविद्यालयासाठी उड्डाणपूल बांधावा, निवारा शेड, पादचारी पुलाची निर्मिती करावी किंवा भुयारी मार्ग तयार करावा, अशी अनेक दिवसांची परिसरातील नागरिकांची तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. नगरसेवक सय्यद मुशीर यांनी काही वर्षापूर्वी स्कायवॉकचे उद्घाटन केले. पण तेही प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. शहरातील विविध भागांतून इथे बसने प्रवास करून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सारडा सर्कल परिसरात कायस्वरूपी बसथांबाही नसल्याने मोठा फेरा मारून विद्यार्थ्यांना बससाठी द्वारकापर्यंत जाऊन बस पकडावी लागते. या भागात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु ते क्वचितच येथे आढळतात. परिसरात गतिरोधकही नसल्याने वाहनांच्या वेगावरही नियंत्रण रहात नाही. अशा अनेक समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार निवेदनही दिले मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.

प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे...
सारडा सर्कलवर शहर बसथांबा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना वेगवान वाहनांना सामोरे जावे लागते. या ठिकाणच्या या गंभीर धोक्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. - अस्लम खान, स्थानिक

बातम्या आणखी आहेत...