आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दाक्षिना‌ट्य भूमी चा राज्यातील पहिला प्रयाेग नाशकात

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रंगकर्मींसाठी एक केसस्टडी ठरणारे ‘भूमी’ हे नाटक खास नाशिककर रसिकांसाठी सादर हाेत आहे. जिवंत कलेचा हा वस्तुपाठ फक्त नाट्यरसिकांसाठीच नाही तर नाटक, नृत्य, संगीत आणि तंत्रज्ञांच्या बाजू या प्रांतातील रंगकर्मींसाठी अभ्यासपूर्ण ठरणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात फक्त मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये हे नाटक हाेणार असून त्यातही पहिला प्रयाेग नाशिकमध्ये हाेत आहे.

फिजिकल थिएटर या प्रकारात आदिशक्ती फाउंडेशन, पाँडिचेरी ही नावाजलेली संस्था जागतिक रंगभूमीवर संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करत असते. ही संस्था भूमी हे एक नवं कोरं नाटक घेऊन भारताच्या दौऱ्यावर आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिक या तीनच शहरांत सादरीकरण करणार आहेत. त्यातही पहिला मान नाशिकला मिळाला आहे.

आदिशक्ती फाउंडेशनचे प्रमुख विनयकुमार हे दक्षिणेतील सुप्रसिद्ध रंगकर्मी आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले आणि सारा जोसेफ यांनी लिहिलेले “भूमी” हे नाटक देशभर गाजत आहे. त्यानिमित्ताने गीत, संगीत, नृत्य आणि अभिनय या सगळ्यांचा अविस्मरणीय मेळ असलेले दाक्षिनाट्य पाहण्याची संधी प्रथमच नाशिककर नाट्यकलावंत, रसिकांना मिळणार आहे. मंगळवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहा वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात हा आगळावेगळा प्रयोग अभिजित पाटील, मुंबई आणि फ्रेंड्स सर्कलचे जयप्रकाश जातेगावकर यांच्या सहकार्याने होत आहे.

असे आहे ‘भूमी’ दक्षिनाट्य
ध्रुवीय जगाच्या किंवा त्याऐवजी अगदी भिन्न स्थानांमधील संभाषणाचा प्रयत्न ही भूमी करू पहात आहे. या नाटकात दोन कलाकार असून, एक दिग्दर्शक आणि तिचा अभिनेता, त्यांच्या वैयक्तिक प्रवासात लिंग, लिंगबद्ध शरीरांवरील हिंसाचार, प्रतिशोध आणि निराकरण याविषयीच्या प्रश्नांमध्ये गुंतलेल्या त्यांच्या वैयक्तिक प्रवासात नाटक वेगळ्या पद्धतीने उलगडत जाते.

बातम्या आणखी आहेत...