आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डल्ला:आंब्याच्या बागेतील 1000 किलो आंब्यांवर मारला डल्ला ; संशयित दोघा भावांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंब्याच्या बागेतील एक हजार किलो आंबे चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. मंगळवारी (दि. ७) गोवर्धन शिवारातील एका फार्म हाउसमध्ये हा प्रकार घडला होता. तालुका पोलिसांनी संशयित प्रवीण गौतम जाधव, प्रशांत गौतम जाधव (रा. गोवर्धन) या दोघा भावांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी दिलेली माहिती आणि मीना कोहोक (रा. सावरकरनगर, गंगापूररोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोवर्धन शिवारात मालकीची शेती आहे. शेतात केशर जातीच्या आंब्याची झाडे लावली आहेत. झाडांना आंबे लागलेले असल्याचे पाहून दोघा संशयितांनी शेतात अनधिकृतपणे प्रवेश करत सुमारे ४० हजार रुपये किमतीचे एक हजार किलो आंबे चोरी केले. दोघांना हटकले असता दोघांनी कोहाेक यांना दमदाटी केली. कोहोक यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक सारिका आहिरराव यांनी संशयितांना गोवर्धन येथे अटक केली. बुधवारी (दि. ८) न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...