आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखुटवडनगर येथील स्व. प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांमधून नृत्यकला सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त कर्नल श्रीधर चितळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते "ऋणानुबंध" या हस्तलिखिताचे अनावरण करण्यात आले.
इयत्ता पहिली ते सातवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना श्रीधर चितळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर आधारित विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी वैशंपायन यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन पर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री भोळे यांनी केले.
यावेळी शाळेचे चेअरपर्सन अंजली प्रधान, इंग्रजी माध्यमाच्या चेअरपर्सन रेखाताई कुलकर्णी, बाल मुक्तांगण शाळेचे चेअरमन मोहन आलाने, मुख्याध्यापिका सुगंधा सोनवणे, अधिक्षिका शैलजा फुलसे, पालक संघाचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष संतोष गाढवे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष्या सोनाली सोनवणे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैशंपायन यांनी सांागितले की, विद्यार्थ्यांचा कल अभ्यासासाेबतच क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमातही हवा. त्यातून विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास हाेत असताे.न
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.