आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या बिकट स्थितीत कायद्याचे रक्षकच बेभान:नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत दीक्षांत समारंभापूर्वी उपनिरीक्षकांच्या तुकडीचा बेधुंद नाच

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना रुग्ण वाढत असतानाही सांस्कृतिक कार्यक्रमात भावी अधिकारी बेभान

पोलिस उपनिरीक्षक तुकडीच्या भावी अधिकाऱ्यांनी दीक्षांत समारंभापूर्वी कोरोना नियमांचे आणि फिजिकल डिस्टन्स नियमांचे उल्लंघन करत बेधुंद होऊन नाच केला. हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिस अकादमी कोरोनामुक्त झाली की काय असा प्रश्न एमपीए संचालकांना पडला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीत शुक्रवारी (दि. २६) रात्री प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकपदाच्या ११८ व्या तुकडीतील भावी अधिकाऱ्यांनी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे बघावयास मिळाले. या भावी अधिकाऱ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कायद्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत अशा प्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा व्यक्त करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमात भावी अधिकारी बेभान ​​

प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या तुकडीला दीक्षांत सोहळ्यापूर्वी जेवणावळी दिली जाते. तसेच संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अकादमीची ११८ वी तुकडी असून साधारण ६८० आधिकारी प्रशिक्षण घेत आहेत. साधारण ३१ मार्चपूर्वी दिक्षांत सभारंभ होऊन तुकडीतील प्रशिक्षणार्थी त्यांच्या कर्तव्यावर रवाना होणार आहेत. मात्र कोरोना काळात अधिकारी बेभान होऊन नाचत होते.

लसीकरण झाल्याचे सांगत बचावाचा प्रयत्न
महाराष्ट्र पोलिस अकादमी परिसर प्रतिबंधित क्षेत्र आहे. प्रशिक्षणार्थींना बाहेर पडण्यास आणि इतर व्यक्तींना आत येण्यास सक्त मनाई आहे. प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षकांनी काेविड प्रतिबंधक लसीचे दाेन डाेस घेतले अाहेत. सध्या अकादमीमध्ये एकही प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक बाधित नाही. हा कार्यक्रम सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीने आयोजित करण्यात आला होता. असा कार्यक्रम दरवर्षी प्रत्येक तुकडीसाठी आयोजित केला जातो, अशी माहिती संचालकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली अाहे. मात्र लस घेऊनही कोरोना काळात मास्क वापर करण्याचे, फिजिकल डिस्टन्सचे पालन आणि धार्मिक आणि इतर कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही असे आदेश शासनाने दिले असताना अकादमीमध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येऊनही ही गंभीर बाब दुर्लक्षित होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तुकडीतील ९० प्रशिक्षणार्थी झाले कोरोनाबाधित
कोरोना लॉकडाऊन काळात प्रशिक्षण घेणाऱ्या तुकडीला निर्बंधात प्रशिक्षण घ्यावे लागले होते. अशा परिस्थितीत अकादमीत काेराेनाचा शिरकाव झाला होता. सुमारे ९० प्रशिक्षणार्थींवर ठक्कर डोम येथे उपचार सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना धार्मिक कार्यक्रमांनाही ५० जणांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. अशा परिस्थितीत हा कार्यक्रम झाला.

३० तारखेला दीक्षांत समारंभाचे केले आयोजन
मंगळवारी (दि. ३०) या तुकडीचा दीक्षांत समारंभ होत असून याप्रसंगी मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांना आमंत्रित करण्याचे नियोजन सुरू आहे. कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी अकादमीमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. असे असताना अकादमीचे संचालक आणि अधिकाऱ्यांना या बडा खाना आणि संगीत रजनी कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येऊ नये याची चर्चा सुरू आहे.

पालकमंत्र्यांच्या अावाहनाचा विसर
पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदीसह प्रशासकीय यंत्रणेकडून नागरिकांना मास्क वापराचे आवाहन केले जात अाहे. मात्र पाेलिस अधिकाऱ्यांना कायद्याचे प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेत या अावाहनाचा विसर पडल्याचे दिसत अाहे.

विभागीय कारवाई होणार
बक्षीस वितरण कार्यक्रमात विनंतीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम प्रशिक्षणार्थीकडून आयोजित करण्यात आला होता. लसीकरण झालेल्या प्रशिक्षणार्थीशिवाय कुणालाही प्रवेश नव्हता. बक्षीस वितरण कार्यक्रम संपल्यानंतर वरिष्ठ अधिकारी निघाल्यानंतर काही प्रशिक्षणार्थीनी अतिउत्साहात चुकीचे वर्तन केले. याची चौकशी करून विभागीय कारवाई होईल. आश्वती दोर्जे, संचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी

बातम्या आणखी आहेत...