आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Danger Zone For Traffic From City Center To ABB Circle Road; Unruly Vehicle Parking Near The Police Station, Accidents Are Also Common| Marathi News

डिबी स्टार स्कॅन:सिटी सेंटर ते एबीबी सर्कल मार्ग वाहतुकीसाठी डेंजर झोन; पाेलिसांसमाेरच बेशिस्त वाहन पार्किंग, अपघातही नित्याचेच

जहीर शेख | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याच्या दुतर्फा असलेली वाहन पार्किंग, बंदी असतानाही सुरू असलेली अवजड वाहनांची वर्दळ आणि या प्रकाराकडे वाहतूक पाेलिसांकडून हाेणाऱ्या दुर्लक्षामुळे सिटी सेंेटर माॅल ते एबीबी सर्कल रस्त्यावर अपघात नित्याचेच झाले आहेत. शनिवारी याच परिसरात हायवा डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी ‘डेंजर झाेन’ ठरू लागला आहे. या अपघातानंतरही या परिसरात अवजड वाहनांची वर्दळ, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग हाेत असून काेणतीही सुधारणा झालेली नाही. या रस्त्यावर हाेणाऱ्या वाहतूक काेंडी व इतर समस्यांवर डीबी स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत....

सिडको, इंदिरानगर, महात्मानगर, काॅलेजराेड, गंगापूरराेड व सातपूरला जाेडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून गाेविंदनगर ते एबीबी सर्कल मार्ग आेळखला जाताे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची माेठी वर्दळ असल्याने वाहतूक काेंडी नेहमीचीच झाली आहे. त्यातही सिटी सेंटर माॅल ते एबीबी सर्कलपर्यंत वाहनांच्या पार्किंगमुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक काेंडीची समस्या बिकट रूप धारण करीत आहे. सिटी सेंटर सिग्नलवर वाहतूक पाेलिस असतात, मात्र ते एका काेपऱ्यात उभे राहून केवळ दंडात्मक कारवाई करतात. सिग्नल ताेडणारे, रस्त्याच्याकडेला वाहन पार्किंग करणाऱ्यांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे पाहणीत दिसून आले. लवाटेनगरच्या रस्त्यावर दुतर्फा अनधिकृत पार्किंगमुळे स्थानिक रहिवासीही वैतागले आहेत. मॉलची पार्किंग सशुल्क असल्याने चालकांकडून वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात.

वाहतूक शाखेकडून कठोर कारवाई होत नसल्याने रस्त्यांवर वाहने उभी राहत असल्याने याठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होत आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात हाेत असताना परिसरात कोणतीही सुधारणा दिसून येत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.अवजड वाहनांना प्रवेशबंदी; तरीही सर्रास वाहतूक : शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर शहर पाेलिस आयुक्तालयाने सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. असे असतानाही शहरातील बहुतांशी रस्त्यावर भरदिवसा वाळू, सिमेंट, स्टील आदी बांधकाम साहित्याच्या अवजड वाहनांसह औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहने धावताना दिसतात. गेल्याच आठवड्यात मुंबई नाका येथे सिमेंट मिक्सर डंपरने धडक दिल्याने तीन-चार वाहनांचे नुकसान झाले. शनिवारी मॉलसमोर वाळूच्या डंपरने वृद्धाला चिरडल्याची घटना घडली. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही ही वाहने येतातच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शनिवारी व रविवारी प्रचंड गर्दी
शहरासह सिडको, इंदिरानगर-नाशिकरोड, सातपूर गंगापूररोड या परिसराला जोडणारा सिटी सेंटर सिग्नल महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सिग्नलवर सकाळी-सायंकाळी वाहनांच्या रहदारीमुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच बनली आहे. विशेषतः शनिवारी व रविवारी या भागात प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याचे डीबी स्टारच्या पाहणीत दिसून आले.

या करणामुळेच गमवावा लागला ७६ वर्षीय भावेंना जीव'सिटी सेंटर सिग्नलवर सायंकाळी ५ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत या वाहतूक कोंडी असते. त्यातही सिग्नलकडून एबीबी सर्कलकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर याच वेळेत त अनधिकृतरीत्या चारचाकी- दुचाकींची पार्किंग केली जाते. त्यामुळे सदरील रस्ता वाहनांच्या मार्गक्रमणासाठी आणखीच अरुंद होऊन अपघाताच्या घटना घडतात. त्यातच याच मार्गावर अनेक बहुमजली इमारतीचे बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी अवजड वाहनांची वर्दळही याच मार्गावरून असते. त्यातूनच गेल्या शनिवारी ७६ वर्षीय दिलीप हनुमंत भावे यांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली.

ग्राहकाकडून माॅलसमाेर रस्त्यावर पार्किंग
मॉलमध्ये दुचाकी-चारचाकी वाहनांची पार्किंग सशुल्क आहे. त्यामुळे माॅलमध्ये येणारे ग्राहक हे शुल्क वाचविण्यासाठी आपली वाहने अनधिकृतरीत्या रस्त्यावरच पार्किंग करतात. अनेक दुचाकीचालक तर दुभाजकांच्या आतमध्ये आपल्या दुचाकी पार्क करत असल्याचेही डीबी स्टारच्या पाहणीत समोर आले. तरीही वाहतूक पाेलिसांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष हाेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिटी सेंटरच्या पाठीमागून विरुद्ध वाहतूक
सिटी सेंटरच्या पाठीमागून त्रिमूर्ती चाैकाकडे विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक अतिशय धोकादायक आहे. प्रसंगी अपघात होऊ शकतो. तरी संबधित विभागाने त्वरित कारवाई करावी.- गिरीश गौतम पगारे, पवननगर

रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे धाेका
मॉलची पार्किंग सशुल्क असल्याने अनेक वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे याठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होत आहे.- मनोज साळवे,नागरिक

वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास
मॉल परिसरात सिग्नलवर तसेच मॉलकडून पुढे एबीबी सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेशिस्त पार्किंग व नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागताे.- संदेश जगताप, नागरिक

बातम्या आणखी आहेत...