आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:धोकादायक वृक्ष तोडण्यास फास्ट ट्रॅकवर देणार परवानगी

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मोकळे भूखंड, नवीन बांधकामाच्या दृष्टीने मंजूर केलेले लेआउट तसेच रस्ते किंबहुना सरकारी प्रकल्पांसाठी अडसर ठरणारे जवळपास ३३२ वृक्षतोडीची प्रकरणे १५ मार्च रोजी वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त झाल्यामुळे रखडले आहेत. उद्यान विभागाकडे अपुरे मनुष्यबळ तसेच लोकप्रतिनिधी व तज्ज्ञ संचालकांशी संबंधित समिती अस्तित्वात नसल्यामुळे तूर्तास धोकेदायक झाडांना पहिल्या टप्प्यात परवानगी दिली जात असून आता दुसऱ्या टप्प्यामध्ये खरोखरच वृक्षतोडीची गरज आहे की नाही याची पाहणी करून संबंधित प्रकरणांना मंजुरी देण्यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी फास्ट ट्रॅकवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील कोणतेही झाड तोडण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणे क्रमप्राप्त ठरते.

४३ धोकेदायक वृक्ष ताेडण्यास मान्यता...
पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून जीवितहानी होण्याची भीती लक्षात घेता उद्यान विभागाने युद्धपातळीवर कामे करून १२७ पैकी ५३ धोकादायक झाडे निश्चित केली. त्यापैकी ४३ झाडे ताेडण्यास परवानगी १३ मे रोजीच दिली असून उर्वरित १० मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत. छाटणीसाठी आलेल्या ३३२ वृक्षांची लवकरच उद्यान निरीक्षकांमार्फत पाहणी करून अहवाल घेतले जातील व त्यानंतर परवानगी दिली जाईल, अशी माहिती उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली.

पाहणी करून निर्णय घेणार
बऱ्याचवेळा गरज नसताना वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून खरोखरच संबंधित झाड धोकेदायक आहे का तसेच एखाद्या प्रकल्पासाठी झाड तोडण्याची गरज आहे का हे तपासून प्रकरण मंजूर केले जाते. सध्या वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात नसल्यामुळे थोडाफार विलंब झाला. मात्र, आता फास्ट ट्रॅकवर सर्व प्रकरणे मंजुरीसाठी सूचना देण्यात आले आहेत. - रमेश पवार, आयुक्त तथा प्रशासक

बातम्या आणखी आहेत...