आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचा शिरकाव:गौळाणे शिवारात बिबट्याने दर्शन

इंदिरानगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौळाणे येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम पांडुरंग चुंभळे यांच्या शेतातील घराच्या आवारात मंगळवारी (दि. २) रात्री १.३० वाजेच्या सुमारास बिबट्याचा शिरकाव झाल्याने चुंभळे कुटुंबियांसह मळे परिसरातील शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. संशय बळावल्यावर सकाळी सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यात बिबट्या शिकारीच्या शाेधात तेथे फिरत असल्याचे दिसून आले.

बिबट्याचा मुक्त संचार असल्याने रात्री बकऱ्या व कुत्र्यांचा आवाज आला हाेता. त्यामुळे सर्वजण अलर्ट झाले. यापूर्वीदेखील दि. २७ जून रोजी चुंभळे यांच्या घराच्या आवारात बिबट्याचा वावर दिसून आला होता. त्यावेळी बिबट्याने पाळीव श्वानावर हल्ला केला होता. पुन्हा आता याच भागात बिबट्या आढळून आला. यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून बिबट्याचे पगमार्क घेण्यात आले आहे. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने यावेळी केले. बिबट्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

तातडीने पिंजरा लावावा

या भागात यापूर्वीही बिबट्या आढळून आला हाेता. वनविभागाने कायमस्वरूपी पिंजरा लावावा. रात्रीची ग्रस्त वाढवावी. नागरिकांमधील भीती दुर करावी.

शांताराम चुंभळे, रहिवासी

बातम्या आणखी आहेत...