आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात बिबट्या अवतरला:शहराच्या मध्यवर्ती भागात झाले कारचालकाला दर्शन! वनविभागाकडून शोध, नागरिकांमध्ये दहशत

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन्यप्राण्यांच्या हक्काच्या अधिवासाला धोका निर्माण झाल्याने वन्यप्राणी थेट शहरात वांरवार दिसु लागले आहे. बुधवारी (ता. 15) सकाळी सहा वाजेच्या सुमारास एबीबी सर्कल ते लवाटेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कारचालकाला बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याने मोकळ्या भुखंडाच्या भितींवरुन झेप घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. बिबट्या शहरात असल्याचे स्पष्ट होताच नागरीकांत मोठी घबराहट पसरली होती.

या दिशेने गेला

भिंतीवरुन झेप घेणारा बिबट्या लगेचच नासर्डी नदीच्या दिशेने झाडाझुडपात गेला. हे दृष्य पाहणाऱ्या कारचालकाने बिबट्याचे छायाचित्रणही केले नंतर हा व्हिडीओ व्हायलर झाला. मात्र बिबट्याच्या दर्शनाने शहरवासियांमध्ये पुन्हा दहशत निर्माण झाली आहे.

वनविभागाकडून शोध

वनविभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला, मात्र बिबट्या दिसुन आला नाही. नाशिक शहरातील नागरी वसाहत असलेला हा मध्यवर्ती भाग आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने चक्क एबीबी सर्कलपासून पुढे लवाटेनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पदपथावरून फेरफटका मारत होता. त्याचा हा फेरफटका एका कारचालकाने बघितला आणि आपल्या मोबाइलमध्ये त्याचे छायाचित्रण केले.

वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, उत्तम पाटील, विजय पाटील यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी साहित्य घेवुन लवाटेनगर येथे आले. या ठिकाणी पाहणी केली असता, त्यांना काही ठिकाणी मातीवर बिबट्याच्या पंजाचे ठसेही उमटल्याचे दिसून आले. मात्र परिसरात शोध घेतल्यानंतरही बिबट्या दिसुन आला नाही.

बिबट्या दिसल्यास घ्या काळजी

''ज्या परिसरात बिबट्या फिरत आहे, त्या परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन नागरिकांमध्ये खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या परिसरात रात्रंदिवस कर्मचारी तयार ठेवले आहे'' - विवेक भदाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक

बातम्या आणखी आहेत...