आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाेत्सव:गिरणारेला एकमुखी दत्तमंदिरात बुधवारी दत्तजयंती महाेत्सव

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरणारे येथील एकमुखी दत्तमंदिराचा १५ वा वर्धापन दिन, दत्त जयंती महोत्सव व मराठी भाषेच्या आद्यकवी महदंबा स्मृतिदिन साेहळ्यानिमित्त बुधवारी ( दि. ७) धर्मसभा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, दत्तमंदिराचे महंत चक्रपाणी बाबा कोठी यांनी दिली.

गिरणारे गावात महानुभाव संप्रदायातील एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त बुधवारी पहाटे देव मंगल स्नान, सकाळी ७ वाजता दत्तात्रय कवच पाठ, सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण, सकाळी ९.३० ते ११.३० दरम्यान अ. भा. महानुभाव परिषदेचे आचार्य प्रवर सुकेनेकर बाबा शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पू. आकाश शास्त्री, गोविंदराज बाबा अंजनेरी, संतराज बाबा (सिडको), दत्तराज बाबा हिसवळकर, दादेराज बाबा (बेलतगव्हाण), गोपीराज शास्त्री,अर्जुन अप्पा (सुकेनेकर) यासह महंत उपस्थित राहणार आहे. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत गिरणारेच्या लक्ष्मी लॉन्स येथे महाप्रसाद होणार असल्याचे आयोजक विशालदादा कोठी, दत्त मंदिर ट्रस्टने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...