आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारंगाची उधळण , भक्तीचा जल्लोष आणि भाविकांची मांदियाळी अश्या भक्तिमय वातावरणात रंगपंचमीला देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थ स्थळ असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त पालखी सोहळा उत्तरोउत्तर रंगी रंगला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे पाऊण लाख भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला आहे.
रंगाची यात्रा म्हणून सर्वदूर परिचित असलेली व राज्यातील लाखो महानुभाव पंथीयांचे श्रद्धा स्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रो उत्सवास रंगपंचमी पासून प्रारंभ झाला- पालखी पुढे उधळणारा रंग हा भाविक प्रसाद म्हणून अंगावर घेतात , अशी येथे श्रद्धा आहे- त्यामुळे हा पालखी सोहळा पाहण्यासाठी व नवस पूर्तीसाठी याठिकाणी राज्यभरातून भाविक दाखल होतात.
यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला- रंगपंचमीला दुपारी साडे तीन वाजता पूर्व महाप्रवेशव्दार येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष्य महंत मनोहरशास्री सुकेणेकर , पूज्य अर्जुनराज सुकेणेकर ,बाळकृष्णराज सुकेणेकर , राजधरराज सुकेणेकर , पूज्य गोपीराज शास्त्री सुकेणेकर, आदी सुकेणेकर संत परिवाराने यांनी देवास विडा अवसर करून स्थान वंदना केली . भाजपचे युवा नेते यतीन कदम व उपसरपंच सचिन मोगल यांच्या हस्ते पालखी पूजन, आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते चरणांकित स्थान पूजा तर मविप्र सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे, उपसभापती डी. बी. मोगल यांच्या हस्ते दुपार आरती झाली.यावेळी प्रतापराव मोगल, डॉ. किरण देशमुख, संग्राम मोगल, पंकज भंडारे, हेमंत भंडारे, माधवराव मोगल, रामराव मोगल, दिलीप खापरे, अशोक मोगल, प्रितेश भराडे, मौजे सुकेणे व परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
महानुभाव पंथ यांचे जागरूक देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुकण्याच्या दत्त मंदिरात केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील व यशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या महानुभव पंथीय भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. महानुभाव पंथांच्या वतीने भाविकांनी योग्य नियोजन केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.