आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अपघातातील आई वडिलांपाठाेपाठ मुलीचाही मृत्यू; दाेन मुले गंभीर

सिडको11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील उत्तमनगर येथील रहिवासी असलेले चव्हाण कुटुंबीय शिरपूर येथे कानबाईचे दर्शन घेऊन नाशिककडे परतत असताना धुळ्याजवळ नरडाणा येथे ट्रॅक्टर व कारच्या अपघातात कारचालकासह चव्हाण दाम्पत्याचा मृत्यू झाला हाेता याच अपघातातील जखमी चार वर्षीय बालिकेचाही उपचारावेळी निधन झाले. चव्हाण दाम्पत्यासह बालिकेवर सिडकाेतील माेरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

साक्री येथील मूळ रहिवासी व सध्या उत्तमनगर येथे राहणारे संदीप शिवाजी चव्हाण (४०) व त्यांच्या पत्नी मीना चव्हाण हे तीन मुलांसह भाड्याची कार करून देवदर्शनासाठी त असताना साेमवारी (दि. १) रात्री उशिरा त्यांच्या कारचा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की कारचा चेंदामेंदा झाला. यात संदीप व मीना चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक हितेश अरुण चौधरी (रा. म्हसरुळ) याचाही जागीच मृत्यू झाला. चव्हाण यांची चार वर्षांची मुलगी जान्हवी (परी) हिचीही उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे तिची प्राणज्याेत मालवली. मुलगा गणेश (६) व मुलगी साक्षी (१०) हेही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संदीप यांच्या पश्चात आई व बहीण तसेच एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...