आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंयती:एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या; सारडा शाळेत शाहु महाराज जंयती

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या शाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे शिक्षिका कविता पवार तर अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका मनीषा पाटील होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून संगीत शिक्षक ओंकार वैरागकर यांनी त्यांच्या जीवनावर आधारित स्वागतगीत सादर केले.

यानंतर शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित कु.आत्तार नूरेन ,पूजा मंडलिक, इच्छा तेजाळे यांनी भाषणे केली. प्रमुख पाहुण्या कविता पवार यांनी सांगितले की, ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी महाराजांनी विशेष प्रयत्न केले. मनिषा पाटील यांनीही शाहू महाराजांच्या कार्याचा ऊहापोह करून शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका प्रियंका निकम, उपमुख्याध्यापिका राजश्री चंद्रात्रे, पर्यवेक्षक शरद शेळके ,सहकार्यवाह मनिषा देशपांडे आदी उपस्थितीत होते. सूत्रसंचालन कु.दिव्या राहणे हिने तर आभार सारा शेख हिने मानले. कार्यक्रमास विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते.