आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा सप्ताह:किक बॉक्सिंग स्पर्धेत डे केअरचे यश ; प्राचार्य शरद गिते यांना घेतली विशेष मेहनत

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हास्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेत डे केअर सेंटर शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत क्रीडा व युवा सेवा संचालनालय अधिकारी कार्यालय (मुंबई, उपनगर) आयोजित क्रीडा सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग २०२२ स्पर्धा आयोजक विशाल जाधव यांच्या देखरेखीखाली पार पडली. या स्पर्धेत डे केअर सेंटर शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत तीन सुवर्णपदके, एक रौप्यपदक, एक कांस्यपदक व एक सन्मानचिन्ह प्राप्त केले. खेळाडूंच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. ल. जि. उगावकर, सचिव गोपाळ पाटील व माध्यामिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य शरद गिते आदींनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...