आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश अर्ज:मुक्त विद्यालय प्रवेशासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदत; पाचवी, आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग तसेच नियमित शाळेत जाऊ न शकलेल्या विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे तसेच त्यांना शालेय परीक्षा देता यावी, यासाठी राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाच्या धर्तीवर राज्याचे मुक्त विद्यालय मंडळ सुरू करण्यात आले आहे. राज्य मुक्त विद्यालय मंडळाने मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेची अंतिम मुदत सुरुवातीला २८ फेब्रुवारी २०२२ होती. त्यानंतर शिक्षण मंडळातर्फे या विहित मुदतीत ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला.

या विहित मुदतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना १५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येतील. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याअंतर्गत पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करता येईल.

या मंडळांंतर्गत दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवी, तेरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवी आणि पंधरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ शकतील. १४ वर्षांखालील मुलांची मुक्त विद्यालय केंद्राचे नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करण्यात येते. शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्या‌र्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

..अशी होईल प्रक्रिया

  • ऑनलाइन नावनोंदणी करणे : १ ते १५ एप्रिल २०२२
  • विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे नमूद केलेल्या केंद्रात जमा करणे : ४ ते १८ एप्रिल २०२२
  • संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे : २२ एप्रिल २०२२
बातम्या आणखी आहेत...