आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Deadline For Registration For Polytechnic Diploma Is 30th June; Opportunity For Technical Education For Students After 10th Standard |marathi News

ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया:पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी 30 जूनपर्यंत नोंदणीची मुदत; दहावीनंतर विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची संधी

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना अकरावीबरोबरच तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध असून तीन वर्षांच्या पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. पॉलिटेक्निकसाठी प्रवेशप्रक्रियाही सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करण्याची संधी असेल. शैक्षणिक वर्ष २०२२ व २०२३ याकरिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलवर सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे.

दहावीत मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेशप्रक्रिया होणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना वेबसाइटवरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. ३० जूनपर्यंता प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्याची निश्चिती करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी https://dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधावा.

पॉलिटेक्निककडे पुन्हा विद्यार्थ्यांचा वाढला कल
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांकडे कमी झालेल्या विद्यार्थ्यांचा ओढा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वाढत आहे. तंत्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत असल्याने पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. प्रवेशात वाढ होण्यासाठी समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम आदी कार्यक्रमांद्वारे पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांनी उपक्रम राबविले आहेत. मागील तीन वर्षांत पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात प्रतिवर्षी १० ते १५ टक्के प्रवेश वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...