आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:शिष्यवृत्ती अर्जासाठी 30 पर्यंत मुदत

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष २०२२ व २०२३ यातील केंद्र शासन पुरस्कृत असलेल्या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संख्या कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याच्या विहित मुदतीत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर महाविद्यालयांनी अर्जांची आॅनलाइन पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

एन.एस.पी. पोर्टलद्वारे केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनांची ऑनलाइन पद्धतीने उच्च शिक्षण संचालनालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन २०२२-२३ साठी केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे.

अर्जाची संख्या कमी, विद्यार्थ्यांना आवाहन
सद्यस्थितीत तिन्ही योजनांचे केंद्र शासनाने निर्धारित केलल्या संचानुसार विद्यार्थ्यांच्या अर्ज भरण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या शिष्यवृत्ती दिल्या जातात. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन या योजनांचा लाभ घेणेसाठी आपल्या स्तरावरुन सर्व महाविद्यालय / विद्यापीठे व संस्थांना यांना सूचना देण्यात याव्यात, असे आवाहन केले आले.

बातम्या आणखी आहेत...