आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करदात्यांना दिलासा:आयटी ऑडिटसाठी 7 पर्यंत मुदत; सर्व्हर संथ असल्याने सीबीडीटीने वाढवली मुदत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काेटींच्या वर उलाढाल असलेल्यांचे इन्कम टॅक्स ऑडिट करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत हाेती. ती वाढवून ७ ऑक्टोबर करण्यात आली आहे. कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंंट, करदाते यांना विविध कागदपत्रे, विवरणासह भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे. सन २०२२-२३ या वर्षाकरिताचे हे इन्कम टॅक्स ऑडिट सादर करण्यासाठीची ही प्रक्रिया सुरू हाेती.

मात्र विवरणपत्रातील विविध कागदपत्रे सादर करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत हाेता. मुदत संपण्याच्या काही दिवस आधी सर्व्हर संथगतीने चालणे, बंद पडणे, कागदपत्र लाेड करण्यासाठी अडचणी येणे अशा तक्रारींचा पाऊस पडला हाेता. त्यामुळे सेंट्रल बाेर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने ही मुदत ७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढवून दिली आहे. नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असाेसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...