आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Death Of Parents Due To Power Outage; Another Seriously Injured Along With Two Lakes, Accident While Returning Home After Getting Married In Igatpuri

दुु:खद:वीज कोसळून माता-पित्याचा मृत्यू; दोन लेकींसह अन्य एक गंभीर जखमी, इगतपुरीत लग्न आटोपून घरी परतताना दुर्घटना​​​​​​​

घोटी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिऱ्हेवाडी येथील एक लग्न आटोपून घराकडे परतत असताना अचानक अवकाळी पाऊस सुरू होऊन वीज कोसळली. यात मालुंजे (ता. इगतपुरी) येथील दांपत्य जागीच ठार झाले असून त्यांच्या दोन मुली व इतर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. दशरथ दामू लोते (३५) व सुनीता दशरथ लोते (३०) असे मृत्यू झालेल्या दांपत्याचे नाव आहे.

वादळी पावसामुळे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपळगाव घाडगा येथील एका आंब्याच्या झाडाखाली दांपत्य मुलगी तेजस्विनी (वय ७) व सोनाली (वय ५) तसेच गिऱ्हेवाडी येथील युवक बाळू चंदर गिऱ्हे (वय २९) यांच्यासह उभे होते. त्याचवेळी अचानक वीज कोसळल्याने लोते दांपत्य जागीच ठार झाले तर त्यांच्या दोन मुलींसह अन्य एक जण गंभीर जखमी झाला. एसएमबीटी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. माजी आ. काशीनाथ मेंगाळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. पो.नि. अनिल पवार, हवालदार विलास धारणकर, भाऊसाहेब भगत, नीलेश मराठे, तलाठी एस. एन. रोकडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...