आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाहिरातींच्या फलकबाजीसाठी शहराच्या विविध भागांतील वृक्षांचा सर्रास वापर केला जात आहे. यासाठी झाडांना खिळे ठाेकून मरण यातना दिल्या जात आहेत. वृक्षांबाबत नाशिक नागरी समितीच्या वतीने 2006 मध्ये जनहीत याचिका दाखल केलेली आहे. असे असतानाही महापालिका व पाेलिस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शहरातील हजाराे झाडांना मरण यातना साेसाव्या लागत आहेत.
सार्वजनिक मालमत्ता कायद्या 1984 नुसार झाडांना काेणत्याही प्रकारचा धाेका पाेहाेचविणे गंभीर गुन्हा असून या गुन्ह्यात शिक्षेसह दंडात्मक कारवाईची तरतुद करण्यात आलेली आहे. मात्र यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव व दुर्लक्षाचा फायदा घेत अनेक व्यावसायिका आपआपल्या आस्थापनांची फुकटात जाहीरात करण्यासाठी झाडांना मरणयातना देत आहेत.
शहरात मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या वृक्षांचे भरभक्कम बुंधे, खोडे, फांद्या यावर खिळे ठोकून, काटेरी तारा आवळून आणि दोरखंडांनी करकचून बांधून आपापले फलक, होर्डिंग्ज टांगले जात आहेत. या प्रकारामुळे झाडाला थेट वर्मी दुखापत होऊन त्यांचे आयुष्य घटते. झाड सजीव असल्याने त्याला या दुखापतींमुळे वेदना होतात.
वहन क्षमता हाेते कमी
झाडावर ठोकलेले खिळे कालांतराने गंजतात. तो गंज वृक्षाच्या बुंध्यांत उतरतात. परिणामी वृक्ष कालांतराने खंगत जाते. त्यामुळे झाडांची वहन क्षमता कमी हाेऊन हळूहळू झाड मरू लागते.
प्रशासनाला कधी जाग येणार
खिळे ठोकल्यामुळे झाडांना होणाऱ्या वेदनांची जाणीव मनपा आयुक्त, उद्यान उपायुक्त तसेच झोपी गेलेल्या वृक्ष प्राधिकरण समितिला कधी येणार? जाहीरातींच्या फलकांसाठी अंगावर जखमा झेलत झाडे अंतिम घटका माेजत आहेत.
- प्रा. दर्शन पाटील, वृक्षप्रेमी
पाथर्डीफाटा ते अंबड लिकंराेडवरील झाडांवर पत्रे ठाेकण्यात आले आहेत. झाडे सजीव असतानाही सिटी सेंटर माॅल परिसरात झाडांवर लाईटींग टाकून त्यांना एकप्रकारे शाॅक दिला जात आहे. मनपाला अल्टीमेटम देऊन याविराेधात तीव्र आंदाेलन उभारण्यात येईल.
- अमित कुलकर्णी, वृक्षप्रेमी
मनपाकडे तक्रार करूनही कारवाई शुन्य
जाहीरातबाजीमुळे शहरारातील हजाराे वृक्षांना हानी पोहचविण्याचा खोडसाळ आणि दुर्दैवी प्रकार ताबडतोब बंद व्हायला हवा. महापालिकेच्या उद्यान विभागाचे व आयुक्तांचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. तक्रार करूनही कारवाई केली जात नाही.
- वैभव देशमुख, लोकसमाश्रय सामाजिक संस्था
जैवविविधता संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत
झाडांबाबत आम्ही नाशिक नागरी कृती समितीच्या वतीने जनहित याचिका दाखल केलेली आहे. झाडांना वेदना देणाऱ्यांवर जैव विविधता संरक्षण कायद्यानुसार महापालिकेने शिफारस करावी व पाेलिस आयुक्तांनी त्याची दखल घेऊन सबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत.
- अश्विनी भट, कृती समितीतील एक याचिकाकर्त्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.