आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामशेज किल्ल्यावर तरुणाचा मृत्यू:उंचावर गेल्याने हृदयविकाराचा झटका, नाशिकमध्ये हळहळ

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामशेज किल्ल्यावर गेलेल्या सिडकोतील २० वर्षीय युवकाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

सिडको शिवपुरी चौकात राहणारे नारायण सरोवर हे आपल्या कुटुंबियांसमवेत शनिवारी रामशेज किल्ल्यावर गेले होते. त्यांचा मुलगा अजय सरोवर (वय २०) हा चक्कर येऊन पडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अजय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तर त्याच्या वडिलांचा फळाचा व्यवसाय आहे. अजयच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अजयच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पेठ रोडवरील रामशेज किल्ल्यावर दर शनिवार आणि रविवार पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामध्ये अनेक तरुण-तरुणी रामशेज किल्ल्याचा उंचीवरचा अंदाज न घेता मार्गक्रमण करत असतात. या ठिकाणी पर्यटन विकास महामंडळ स्थानिक पोलिसांनी वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे अजय हा मित्रांसोबत सोबत नव्हे तर कुटुंबीयांसोबत किल्ल्यावर गेला होता. मात्र, उंचावर गेल्याने त्यास चक्कर आल्याने भोवळ येवून तो खाली पडल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...