आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिपाईच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना व नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनंतर लोंढे यांना धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोंढे हे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय आहेत. याप्रकरणी रिपाईचे जिल्हा संपर्क प्रमुख समाधान जगताप यांनी पाेलिसांत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, शुक्रवारी (ता. 29) रात्री 8 वाजेच्या सुमारास प्रकाश लोंढे यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांहून फोन आले. समोरील व्यक्तीने हिंदी भाषेत लोंढे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. व्यक्तीने राजस्थानमधून फाेन केल्याचा संशय आहे. दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकारच्या धमकीचे फोन आले होते. आता तिसऱ्यांदा फोनद्वारे धमकी देण्यात आल्याचे प्रकाश लोंढे यांनी सांगितले. सातपूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.